वेटलिफ्टिंगमध्ये सतीश शिवलिंगमला गोल्ड; राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेलं हे तिसरं सुवर्णपदक

वेटलिफ्टिंगमध्ये सतीश शिवलिंगमला गोल्ड; राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेलं हे तिसरं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताने गोल्डन कामगिरी केली आहे. वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने वेटलिफ्टिंगच्या 77 किलो वजनी गटात उल्लेखनीय कामगिरी करत गोल्ड मेडल जिंकलंय. या गोल्डन कामगिरीने  राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेलं हे तिसरं सुवर्णपदक आहे. सतीशने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली आहे. सतीशने स्नॅचमध्ये 144 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 173 किलो वजन उचललं आहे. 25 वर्षीय सतीशने 2014 मधील ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं. 

पहिल्या दिवशी वेटलिफ्टर गुरुराजाने रौप्यपदकाची कमाई करत भारताचं पदकांचं खातं उघडलं, तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण कमावून पहिलं गोल्ड मेडल मिळवण्याचा मान पटकावला. दुसऱ्या दिवशी संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवत विश्वविक्रम रचला होता. तर अवघ्या 18 वर्षांचा वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात कांस्य पदकाची भर घातली होती.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com