इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा 'त्या' वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत

साम टीव्ही
शुक्रवार, 26 जून 2020
  • इंदोरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं
  • इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संगमनेर कोर्टात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात मुला-मुलीच्या जन्माविषयी इंदोरकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

याच वादग्रस्त वक्तव्यावरून इंदोरीकर महाराज चांगलेच अडचणीत आलेत. या वक्तव्यावरून राज्यभरात इंदोरीकरांविरोधात तीव्र पडसाद उमटले. अखेर जिल्हा आरोग्य प्रशासनानं त्यांच्याविरोधात संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भात रंजना गंवांदे यांनी तक्रार नोदवली होती. त्यानुसार PCPNDT अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
 राज्यात इंदोरीकर महाराज यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या किर्तनात मार्मिक भाष्य करत श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची हातोटी इंदोरीकरांमध्ये आहे. 

इंदोरीकरांच्या याच शैलीमुळे त्यांच्या विरोधात आणि समर्थनात दोन गट पडले होते. अनेक संघटनांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं त्यांना आपले किर्तनाचे कार्यक्रमही रद्द करावे लागले. तर या वादानंतर इंदोरकरांनी व्यथित होऊन किर्तन सोडून शेती करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. मध्यंतरीच्या काळात हा वाद शमलाही. मात्र त्या वक्तव्यानं अजूनही इंदोरीकरांचा पिच्छा सोडलेला नाही. आता त्यांचायावर काय कारवाई होतीय हेच पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live