काँग्रेसच्या बंदला आपसातल्या राडेबाजीचं गालबोट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं.

पण, काँग्रेसच्या आंदोलनाला दोन कार्यकर्त्यांनी गालबोट लावलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती. बाईक रॅलीतल्या कार्यकर्त्याची बाईक घासली गेली. सरकारविरोधात जोशात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याची सटकली. मग काय त्यानं मागं पुढं न पाहता सरळ धक्का देणाऱ्या बाईकस्वाराला भररस्त्यात बुकलायला सुरूवात केली. शेवटी पोलिस अधिकाऱ्याला भांडणाऱ्या दोघा कार्यकर्त्यांमध्ये मध्यस्थी करावी लागली.

मोदी सरकारला इंधन दरवाढीचा जाब विचारण्याऐवजी दोन कार्यकर्ते एकमेकांनाच जाब विचारू लागले. त्यामुळं भररस्त्यात काँग्रेसच्या आंदोलनाचा तमाशा झाला.

भररस्त्यातल्या आपसातल्या राड्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते गायब झालेत. रस्त्यातच भिडल्यामुळं आता पोलिस त्यांना गजाआड करून जाब विचारण्याची शक्यता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live