काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे, काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा- डॉ. भारत पाटणकर

काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे, काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा- डॉ. भारत पाटणकर

काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. त्यामुळे काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे आणि आंबेडकर यांना काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा जर आंबेडकरांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले तर काँग्रेसला मोठा फायदा होईल, असा विश्वास श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वी डॉ. भारत पाटणकर आणि सहकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून "भाजपला फायदा होणार नाही असा निर्णय आपण घ्यावा "असे आवाहन केले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी पाटणकर यांनी काँग्रेसलाही पत्र लिहावे, अशी भूमिका मांडली होती.

आज पाटणकर यांनी काँग्रेसला त्याबाबत आवाहन केले आहे. "भाजपकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे, मात्र काँग्रेसकडे अजून उमेदवार ठरलेला नाही. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना जागा कमी द्याव्यात मात्र पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित करावे. त्यामुळे देशात परिवर्तनाची लाट तयार होईल. वंचित बांधव काँग्रेसच्या पाठीशी उभा राहतील,"असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

Web Title: Congress alliance should declare Prakash Ambedkar as PM candidate Says Dr. patankar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com