Loksabha 2019 : राज ठाकरेंविरोधातील भाजपच्या क्‍लिपची तपासणी करा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपकडून दाखविण्यात येणारे व्हिडिओ निवडणूक आयोगाने तपासावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा आणि प्रदेश प्रवक्‍त सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. 

गेल्या दोन आठवड्यांपासून राज ठाकरे आपल्या सभांमध्ये व्हिडिओ दाखवत भाजपच्या अनेक दाव्यांची "पोलखोल' करत आहेत. "लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी-शहांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपदेखील व्हिडिओचाच आधार घेणार आहे. 27 तारखेला होणाऱ्या भाजपच्या सभेत मनसेला मनसेच्याच पद्धतीने उत्तर देणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. 

मतदारांवर प्रभाव पडण्याची भीती 
मुंबईतील प्रचाराची सांगता शनिवारी (ता.27) होत आहे. त्यामुळे भाजपकडून दाखविण्यात येणाऱ्या व्हिडिओंना कोणताही पक्ष किंवा नेता उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपने केलेले आरोप दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येतील आणि मतदारांवर प्रभाव पडू शकतो. म्हणून भाजपचे व्हिडिओ आयोगाकडून तपाण्यात यावेत, असे देवरा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Congress demands video clip on Raj Thackeray shown BJP in rally

संबंधित बातम्या

Saam TV Live