वंचित आघाडी आणि मनसेला महाआघाडीत घेणार : अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

नागपूर : लोकसभेच्या वेळी मनसेला आघाडीत घेण्यास विरोध करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना सोबत घेण्यास तयारी दर्शविली. आघाडीतील मित्र पक्षांचा आक्षेप नसल्यास आपलीही हरकत नसल्याचे त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

एका खासगी कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण आज नागपूरला आले होते. या वेळी त्यांना मनसेबाबत विचारणा केली असताना मनसेचा पर्याय खुला असून अद्याप याचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. लोकसभेच्या वेळी आम्ही मनसेचा विचार केला नव्हता. आता विचार बदलला आहे, असेही ते म्हणाले. लोकसभेतील पराभवानंतर लगेच आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत धुरा सांभाळण्यास आपणास सांगण्यात आले आहे.

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसाठी आमची दारे आजही खुली आहेत. चर्चेसही तयार आहोत. वंचितचे पदाधिकारी परस्पर विरोधात विधाने करीत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. याबाबत त्यांनीच वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर बोलताना भाजप देशाच्या लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीला न शोभणारे भाजपचे वर्तन सुरू आहे. पण, जास्त काळ हे चालणार नाही. कॉंग्रेसमधील राजीनामासत्राबद्दल विचारणा केल्यावर ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाची जबाबदारी नेत्यांनी घेणे अपेक्षित असते. तशी ती घेतली गेली आहे.

Web Title: Congress leader Ashok Chavan says MNS will be include in MahaAghadi

संबंधित बातम्या

Saam TV Live