कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार मुंबईत, मात्र आमदारांचा भेटण्यास नकार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जुलै 2019

मुंबई : कर्नाटकमधील नाराजीनाट्य अजूनही सुरुच असून, मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटण्यास आमदारांनी नकार दिला आहे.

मुंबई : कर्नाटकमधील नाराजीनाट्य अजूनही सुरुच असून, मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटण्यास आमदारांनी नकार दिला आहे.

मुंबईतील रेनेसाँन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या कर्नाटकच्या आमदारांनी पोलिसांना पत्र लिहून शिवकुमार यांना भेटण्याची इच्छा नसून, त्यांना हॉटेलच्या परिसरात फिरकू देवू नये अशी विनंती केली आहे. आज सकाळपासून हॉटेल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडून हॉटेल परिसरात गो बॅक शिवकुमार, गो बॅक कुमारस्वामी अशा घोषणा देण्यात आल्या. कर्नाटक सरकार आम्हाला हॉटेलमधून पळविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला आहे.

दरम्यान, आज सकाळी हॉटेलमध्ये दाखल होत असताना शिवकुमार म्हणाले, की मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. मी या हॉटेलमध्ये खोली घेतली असून, माझे मित्रही या हॉटेलमध्ये आहेत. भाजपचे नेते यांना कसे काय भेटू शकतात, आम्ही का नाही. आमच्या घरात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करण्याच्या गरजेची आहे. त्यासाठी येथे आलो आहे.

 

Web Title: Congress leader DK Shivkumar come to Mumbai meet MLAs in Karnataka


संबंधित बातम्या

Saam TV Live