महाआघाडीला मोदी लाटेसमोर टिकाव धरण्यासाठी 'मनसे'बळ उपयोगाचे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

मुंबई : मोदी लाटेसमोर टिकाव धरण्यासाठी राज ठाकरे यांचे मनसेबळ उपयोगाचे असल्याचे बहुतांश काँग्रेसजनांचे मत आहे. महाआघाडीत 'वंचित'ला सामावण्याऐवजी मनसेला सहभागी करून घ्यावे, अन्‌ भाजप लढत असलेल्या विधानसभा क्षेत्रात त्यांना संधी द्यावी, असा प्रस्ताव काही बड्या मंडळींनी ठेवला आहे. शिवसेनेविरोधात न बोलून मराठी मतपेटी राखण्याकडे राज ठाकरे यांचा कल आहे. ते लोकसभा निवडणुकीतही शिवसेना उमेदवारांबद्दल फारसे बोलले नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेबद्दल ममत्व दाखवले आहे. त्याचा लाभ घेत महाराष्ट्राच्या शहरी भागातल्या जागा मनसेला द्याव्यात. राज्यात भाजप- शिवसेना युती अभेद्य असल्याने आगामी विधानसभा निवडणूक अडचणीची ठरेल हे स्पष्ट दिसत आहे. या परिस्थितीत गर्दी खेचणारे राज ठाकरे समवेत असणे उपयोगाचे ठरेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर नमूद केले.

सोमवारी (ता.8) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी-राज ठाकरे भेट या प्रयोगाची चाचपणी मानली जाते. राज यांच्या परप्रांतीयांना विरोध करण्याच्या धोरणामुळे त्यांना समवेत घेणे योग्य होणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रारंभीचे मत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष या नात्याने अशोक चव्हाण यांनी तसे स्पष्ट केले होते. मात्र, आता हिंदीभाषक भागाने काँग्रेसला नाकारले असताना, निदान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपुरता हा आग्रह सोडावा असे या गटाचे मत आहे.

मुंबई, पुणे, नाशिक येथे भाजपसमोर मनसे हा प्रयोग यशस्वी होऊ शकेल, असेही एका पाहणीतून पुढे आले असल्याचे समजते. सध्या कॉंग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती असल्याने नक्की या प्रस्तावाबाबत वाट पाहावी लागेल असे सांगण्यात आले.

Web Title: Congress leaders demands for include MNS in Mahaaghadhi

संबंधित बातम्या

Saam TV Live