काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला ; चव्हाण देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

काँग्रेसचा बालेकिल्ला अशी नांदेडची ओळख असलेल्या मतदारसंघावर आतापर्यंत अशोक चव्हाण यांचे एकहाती वर्चस्व होते. अगदी २०१४ च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी तब्बल ८० हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना ही किमया साधता आली नाही. मतमोजणीच्या अखेरच्या फेरीअंती त्यांना तब्बल पन्नास हजाराच्या फरकाने हार पत्करावी लागली.

खरंतर चव्हाणांचा हा पहिलाच पराभव नाही. कारण यापुर्वी १९८९ सालीही ते या मतदारसंघातून पराभूत झाले होते. तसेच १९७७ नंतर दर पंधरा वर्षांनी धक्कादायक निकाल देण्याची परंपरा या निकालाद्वारे नांदेडकरांनी यंदाही कायम राखली आहे. 

या पराभवानंतर अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा स्वत:हून राजिनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

WebTitle : marathi news congress maharashtra state party prez. ashok chavan lost from nanded big blow to congress 

संबंधित बातम्या

Saam TV Live