कॉंग्रेसशिवाय मोदीमुक्त भारत ? 

कॉंग्रेसशिवाय मोदीमुक्त भारत ? 

केंद्रात तिसरी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नांना पुन्हा वेग आलाय. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीत शरद पवारांसह विविध पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली आणि या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली. बिगर कॉंग्रेस आणि बिगर भाजप आघाडी तयार करण्याचा प्रयत्न स्वागतार्ह असला, तरी तो कितपत व्यवहार्य असेल, यासाठी प्रतीक्षाच करावी लागेल.    

तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सकाळीच दिल्ली गाठली आणि राजधानीतलं वातावरण तापलं. त्यांनी भाजपचा नाराज मित्रपक्ष शिवसेनेसोबतच बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीमुळं मोदींच्या विरोधात तिसरी आघाडी Active करण्याच्या घडामोडींना वेग आल्याची चर्चा सुरु झाली. आधी ममता दीदींनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रीय जनता दलाच्या मिसा भारती आणि बिजू जनता दलाच्या नेत्यांची भेट घेतली. या सगळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट सर्वाधिक चर्चेची ठरली. 2019 मधे केंद्रात मोदींना टक्कर देण्यासाठीआघाडी करणं आवश्यक असलं तरी ती आघाडी कॉंग्रेसला वगळून करणं, कितपत शहाणपणाचं ठरणार, याचं उत्तर सध्या तरी कोणाकडंच नाही. पण तरीही ममता बॅनर्जी यांनी याचा आग्रह धरलाय. 

ममता बॅनर्जींचा प्रयत्न चांगला असला, तरी कॉंग्रेसला बाजूला ठेऊन मोदींसमोर आव्हान उभं करणं कितपत शक्य होणार, ममता बॅनर्जीही कॉंग्रेसला मोदींसारखंच शक्तीहीन समजू लागल्या आहेत का, असं करुन त्या स्वतःबरोबरच इतरांचीही फसवणूक करत आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक अस्मिता, त्याही टोकदार झालेल्या कितपत चालतील, याची उत्तरं मिळवण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरु झालेत. 

एकूण मोदीमुक्त भारताची कल्पना विरोधकांसाठी चांगली असली, तरी कॉंग्रेसशिवाय अशी कल्पना करणं कितपत व्यवहार्य ठरणार, यासाठी 2019 पर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com