ज्यांना प्रश्‍नपत्रिका सांभाळता येत नाहीत, ते देश सांभाळतायत : काँग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्ली : 'या सरकारला प्रश्‍नपत्रिकाही नीट सांभाळता येत नाहीत. हे देश कसा काय सुरक्षित ठेऊ शकणार आहेत', अशा शब्दांत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी 'सीबीएसई' पेपर फुटीच्या प्रकरणात केंद्र सरकावर टीका केली. 'हाच प्रकार 'यूपीए'च्या कार्यकाळात घडला असता, तर देशभर प्रचंड प्रमाणात गदारोळ झाला असता', अशी टिप्पणीही सिब्बल यांनी केली. 

'सीबीएसई'चे पेपर फुटल्यामुळे दोन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशभरात विद्यार्थी, पालक आणि काही राजकीय पक्षांनी याविरोधात निदर्शने केली. 

सिब्बल म्हणाले, "सगळ्यांत आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, या पेपर फुटीची जबाबदारी कुणीच घेत नाही. या क्षणी आमचे सरकार असते, तर नेमकी कशी प्रतिक्रिया उमटली असती, याची तुम्ही कल्पना करू शकता. प्रश्‍नपत्रिका सांभाळता न येणारे सरकार देशाला सुरक्षित ठेवण्याचा दावा करत आहे. देशभरात विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. शिक्षण व्यवस्था प्रचंड महाग झाली आहे.'' 

'पेपर फुटीबद्दल सरकारला आधीपासूनच माहीत होते', असा आरोप सिब्बल यांनी केला. 'फुटलेला पेपर परीक्षेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ई-मेलवर उपलब्ध झाला होता. हा पेपर फुटल्याचे 'सीबीएसई'च्या प्रमुखांना माहीत होते. अशा प्रकरणांची जबाबदारी सरकारने घ्यायची नाही, तर कुणी घ्यायची', असा प्रश्‍नही सिब्बल यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live