"काँग्रेस कार्यकर्ते भलेही माझा प्रचार करत नसले तरी ते मनाने माझ्यासोबत"  : गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

नागपूर: नागपूर लोकसभा मतदारसंघातून माझ्या विजयाबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही विश्वास आहे. काँग्रेस कार्यकर्ते भलेही माझा प्रचार करत नसले तरी ते मनाने माझ्यासोबत आहेत, असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे मला समर्थन असून ते फोन करून मला पाठिंबा देत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. नागपूर येथील एका प्रचारसभेत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, काँग्रेसचे कार्यकर्ते मला फोन करत आहेत. ते माझ्या विजयाबाबत निश्चिंत असून ते माझ्याबरोबर आहेत. ते भलेही औपचारिकरित्या काँग्रेसचा प्रचार करत असले तरी मानसिकरित्या ते माझ्याबरोबर आहेत.

Web Title : marathi news congress party workers are with me says nitin gadkari 

संबंधित बातम्या

Saam TV Live