जाहीरनाम्यात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणा आणि माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 एप्रिल 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठी Congress तर्फे जाहीरनामा प्रसिद्ध केलागेला. 'हम निभाएंगे' अशी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची Tagline ठेवण्यात आली आहे. नवी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय.. 

जाहीरनाम्यात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणा आणि माहिती : 

  • जाहीरनाम्यात कुठलीही माहिती खोटी नाही
  • गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची जाहीरनाम्यात काँग्रेसकडून हमी
  • गरिबांचे उत्पन्न किमान 72 हजार रुपये करणार
  • जाहीरनाम्यात शेतकरी, बेरोजगारांना प्राधान्य
  • शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडला जाणार 
  • जीडीपीच्या 6 टक्के पैसा शिक्षण क्षेत्रावर खर्च करणार
  • देशातील तरूणांसाठी जाहीरनाम्यात महत्वाच्या गोष्टींची तरतूद
  • शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही तर तो कायदेशीर गुन्हा नसेल
  • 10 लाख युवकांना ग्रामपंचायतीत रोजगार उपलब्ध करणार 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींसह सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.  

संबंधित बातम्या

Saam TV Live