काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी गुरुदास कामत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गेल्याच वर्षी त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते.

काँग्रेसनं त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दिव दमण या राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या वर्षी त्यांचं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत काँग्रेसकडून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांत त्यांचं प्राबल्य होतं. 

WebTitle : marathi news congress sr leader gurudas kamat passes away in new delhi  

संबंधित बातम्या

Saam TV Live