निकालपूर्वीच सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड

निकालपूर्वीच सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड

बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

राज्य कॉंग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर आदी प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. सुमारे दीड तास झालेल्या चर्चेत सरकार वाचविण्यासाठी काही उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 
लोकसभेचा निकाल उद्यावर आला असताना वेणुगोपाल यांच्या बंगळुरातील आगमनाला राजकीयदृष्ट्या महत्त्व देण्यात येत आहे. निवडणुकीनंतर काही माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील आघाडीची पीछेहाट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा युती सरकारच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

'एक्‍झिट पोल' जाहीर झाल्यानंतर भाजपने "ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढविल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बंडखोर नेते रमेश जरकीहोळी यांनी दिल्लीला प्रयाण केले आहे. आमदार रोशन बेग यांनी बंडखोरीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

कुंदगोळ व चिंचोळी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाबाबतही साशंकता आहे. त्यामुळे सरकारची पूर्वीपेक्षा चिंता वाढली आहे. या सर्व बाबींवर नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी वेणुगोपाल यांच्यामार्फत संदेश पठवून सरकार वाचविण्यासाठी सर्व ते उपाय करण्याची सूचना केली आहे.  

Web Title: Congress struggle to save the government in Karnataka

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com