तेलगू देसम आणि काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठराव प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 जुलै 2018

मोदी सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठराव प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठराव प्रस्तावाच्या निमित्ताने उरलेले विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील.

या ठरावावरील चर्चेच्या वेळी आपल्या सदस्यांनी उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस, भाजपा, तेलगू देसम, अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद यांसह जवळपास सर्वांनी पक्षादेश जारी केला आहे.

कॉंग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधींच्या भाषणाकडेही सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. मोदींसमोर मला फक्त 15 मिनिटे बोलण्याची संधी मिळू दे, ते माझ्यासमोर निरुत्तर होतील, असा दावा राहुल गांधींनी कर्नाटकातल्या निवडणूक प्रचारसभेत केला होता. त्याला मोदींनीही सडेतोड उत्तर दिलं होतं.

दरम्यान, आजच्या चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस संसदीय लोकशाहीसाठी महत्‍वाचा असल्याचं म्‍हटलंय. आज सविस्तर, सखोल आणि निकोप चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live