सोनिया गांधींचं शिवसेनेबद्दल मोठं वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मुंबई : भाजप आणि शिवसेना एकत्र येणार नसतील तर सेनेला पाठिंबा देण्यासाठी आपण पुढे यायचे नाही, असे कॉग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कळवले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते.

सेना- भाजप यांचे एकमेकांशी पटणार नसले तर आपण सेनेच्या पाठीशी उभे रहायचे काय अशी विचारणा महाराष्ट्रातील कॉग्रेस नेत्यांनी केली होती.त्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर युतीतील परिस्थिती कोणतीही असली तरी कॉँग्रेस जनतेचा कौल स्वीकारून विरोधी पक्षात बसणार असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्यासाठी चाचपणी करीत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती. या सर्व घडामोडी सोनिया गांधी यांच्या कानावर टाकल्या. त्यावर सोनिया यांनी घाई करू नका योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याचे समजते.

कॉंग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. पाठिंबा देण्यापूर्वी किंवा सत्तेत सहभागी होण्यापूर्वी या सर्व बाबी तपासल्या जातील. पक्षाचे कुठलेच नुकसान होऊ नये, याचीही खबरदारी घेतली जाईल. कॉंग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. केवळ तात्पुरत्या लाभासाठी सत्तेत सहभागी होऊ नये. याचे भविष्यात पक्षावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे काहींचे म्हणणे असल्याचे कळते.

Web Title : Congress Will Not Support Shivsena Say's sonia gandhi

संबंधित बातम्या

Saam TV Live