#Loksabha2019: स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा देण्याची काँग्रेसची तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आघाडी सोबत जाणार असून दोन जागा देण्याची काँग्रेसची तयारी आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

श्री. शेट्टी म्हणाले, काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांच्याशी थोड्यावेळापूर्वी माझी चर्चा झाली. हातकणंगले सोबत सांगली किंवा वर्धा येथील जागा स्वाभिमानीला मिळण्याची शक्यता आहे. असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान खासदार शेट्टी यांना आज एका कार्यकर्त्यांने निवडणूकीसाठी पैसे दिले. याचा संदर्भ घेत शेट्टी यांनी रघुनाथदादा पाटील यांनी केलेल्या लुबाडणुकीच्या आरोपाला उत्तर दिले. श्री. शेट्टी म्हणाले, मी जर हातकणंगले मतदार संघास लुबाडले असतो तर लोकांनी मला निवडणूक लढवण्यासाठी पैसे दिले नसते.  

Web Title: marathi news congress willing to leave 2 seats for swabhimani shetkari sanghatana 

संबंधित बातम्या

Saam TV Live