'केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच हवे'- काँग्रेस कार्यकर्ते

अक्षय कस्पटे
गुरुवार, 14 मार्च 2019

राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक अक्षय कस्पटे यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत!

'केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच हवे आहे', असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसचेच कार्यकर्ते म्हणतात.. त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते असे म्हणत असतील, तर हे पक्ष जनतेसमोर जाऊन काय भूमिका मांडणार आहेत? सध्याची परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी अवघड दिसत आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. 

काँग्रेसची सध्याची सगळ्यांत मोठी चूक म्हणजे ज्या विषयांवर वाद टाळायला हवा होता, ते त्यावरच बोलतायत! म्हणजे, सर्जिकल स्ट्राईकचे सरकारकडे पुरावे मागणे किंवा 'कपाळावर गंध असलेल्यांची भीती वाटते', असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे वक्तव्य वगैरे.. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अजहरचा उल्लेख 'अजहरजी' असा केला. 

महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वांत मोठे आव्हान आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे.. याशिवाय, पक्षातील बड्या नेत्यांची सुरू असलेली फोडाफोड हीदेखील त्यांच्यासाठी एक डोकेदुखीच आहे. वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम'ने प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानुसार सर्व 48 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले, तर त्याचा 100 टक्के फायदा भाजप-शिवसेनेलाच होणार आहे. याचे कारण प्रत्येक मतदार संघामध्ये आंबेडकर यांना मानणारे किमान पन्नास-साठ हजार मतदार आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही इतर विरोधी पक्षांशी आघाडी केली नाही, तर राज्यात भाजप-शिवसेनेचे चाळीसहून अधिक उमेदवार निवडून येतील, असेच चित्र आहे. 

या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटते? 

  • मुख्यमंत्री फडणवीस हे यंदाची निवडणूक भाजपच्या बाजूने फिरवू शकतील? 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीशिवाय आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसमोर फडणवीस यांचे आव्हान असेल का? 
  • विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर काय अडचणी येतील? 
  • यंदाच्या निवडणुकीत वारं कुठं वाहत आहे? 
  • Web Title:Congress workers want Modi Government back in power writes Citizen Journalist Akshay Kaspate


संबंधित बातम्या

Saam TV Live