चिपी विमानतळावरून श्रेयाची लढाई; विमानतळाचं उद्घाटन रखडवल्याचा राणेंचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

चिपी एअरपोर्ट विमानाच्या टेक ऑफसाठी सज्ज झालंय. चिपी विमानतळावर विमान उतरण्याआधीच राजकारण मात्र जोरात सुरू झालंय.

चिपी विमानतळाचं चार वर्षांपूर्वीच बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. सरकारनं चिपी विमानतळाचं काम रखडवल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय.

चिपी विमानतळ हे आपलंच आपत्य आहे, असं सांगत नारायण राणेंनी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतलाय.

चिपी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल तेव्हा होईल. तोपर्यंत राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपांचे फटाके मात्र फुटतच राहणार आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live