मुंबईत विकला जाणारा 98 टक्के बर्फ दूषित ; ऐन उन्हात रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे खाताना मुंबईकरांनो काळजी घ्या

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 एप्रिल 2018

वाढत्या उन्हावर मात करण्यासाठी मुंबईकर उघड्यावरील थंडगार सरबतं, शीतपेयांचं सेवन सर्रास करतात. मात्र या पेयांमध्ये गारव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ९८ टक्के बर्फाचे नमुने दूषित असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणारे विक्रेते यांच्याकडून तपासणीसाठी बर्फाचे ४१० नमुने गोळा करण्यात आले होते. त्यापैकी ४०० म्हणजे ९८ टक्के नमुने दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

वाढत्या उन्हावर मात करण्यासाठी मुंबईकर उघड्यावरील थंडगार सरबतं, शीतपेयांचं सेवन सर्रास करतात. मात्र या पेयांमध्ये गारव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ९८ टक्के बर्फाचे नमुने दूषित असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणारे विक्रेते यांच्याकडून तपासणीसाठी बर्फाचे ४१० नमुने गोळा करण्यात आले होते. त्यापैकी ४०० म्हणजे ९८ टक्के नमुने दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दूषित बर्फामध्ये इ-कोलाय या शरीराला घातक असलेल्या विषाणूचे प्रमाण किती आहे, या दृष्टीने आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. महिनाभरात १४ हजार ७०० किलो बर्फ नष्ट करण्यात आला आहे, तर शहरातील बर्फ तयार करणाऱ्या १५ कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या दूषित बर्फाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, जुलाब, संसर्ग होण्याची शक्यता आहे.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live