अशुद्ध आणि दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उलटी, जुलाबाचा त्रास

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

उसळीत चिकनचा तुकडा सापडल्यानंतर आता अशुद्ध आणि दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना त्रास सुरू झालाय. अधिकारी, कर्मचाऱ्यांना उलटी, जुलाबाचा त्रास होतोय. तब्बल 100 पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी रूग्णालयात दाखल झालेत. 

आज सकाळपासुन ते दुपारी 2 वाजेपर्यंत 100 पेक्षा अधिक मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंत्रालयातील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मंत्रालयात पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी आहेत. 

दरम्यान पाण्याचा मुद्दा विधानपरिषदेत विरोधकांनी लावून धरला. सरकारनं त्याची दखल घेत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. 

WebTitle :marathi news health contaminated water made hundreds of officers and workers in mantarlaya sick 

संबंधित बातम्या

Saam TV Live