बाटलीबंद पाण्यात शेवाळ; तुमच्या आरोग्याशी सुरु आहे खेळ!

अमोल कविटकर
बुधवार, 12 जून 2019

तुम्ही घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत घेऊनच बाहेर पडा. कारण, बाटलीबंद पाण्यातून तुमच्या आरोग्याशी खेळ सुरुय. वरच्या फोटोत पाहा, पाण्याचा रंग हिरवा असून त्यामध्ये शेवाळ असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे हे पाणी पिऊन विकतचं दुखणं करून घेतोय. या बाटल्यांवरील मॅनिफॅक्चर डेट 22 एप्रिल 2019. म्हणजे, पाणी सीलबंद करून दोन महिनेही झालेले नाहीयत. तरीदेखील या पाण्यात शेवाळ दिसतंय यावरुन हे पाणी किती शुद्ध होतं हे स्पष्ट होतं. 

पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पाणी व्यवसायिकांचा गोरखधंदा उजेडात आणला. उकाड्याच्या दिवसात बाटलीबंद पाण्याला मोठी मागणी असते. याचाच फायदा नफेखोर उठवतात आणि ते राजरोसपणे अशुद्ध पाणी बाटलीबंद करुन विकतात. 

विशेष म्हणजे पाण्याचा शुद्धतेसंदर्भात चाचणी करणारी यंत्रणा असली तरी ती अपुरी पडताना दिसतंय. त्यामुळं अशा कंपन्याचं फावतं. ते शुद्ध पाणी म्हणून अशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी मारतात. स्वत:चा खिसा भरण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ सुरुये. त्यामुळं तुम्ही सावध व्हा, हा, शक्यतो, घरातून निघताना पाण्याची बाटली सोबत घ्या

आम्ही तुम्हाला घाबरवत नाही तर सावध करतोय. जर बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली तर सर्व पडताळणी करुनच पाणी विकत घ्या.

Web Title : marathi news contaminated water in packaged drinking water bottle 

संबंधित बातम्या

Saam TV Live