सावधान! हवा देणार कोरोनाच्या विषाणूंना आसरा?

साम टीव्ही
गुरुवार, 30 एप्रिल 2020
  • हवेत आढळली कोरोनाची गुणसूत्रे
  • आता हवाही बनणार माणसाची शत्रू?
  • हवा देणार का कोरोनाच्या विषाणूंना आसरा?

कोरोनाच्या विषाणूची गुणसूत्र हवेत सापडल्याचा दावा वुहानमधील संशोधकांनी केलाय. त्यामुळे जगासमोर नवी डोकेदुखी उभी राहिलीय, पाहूयात काय आहे प्रकरण...

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी जगभरात संशोधकांनी कंबर कसलीय. कोरोनाचा विषाणू कुठं जगतो, कुठं मरतो यावरही मोठ्या प्रमाणावर संशोधनं सुरूय. त्यातच आता कोरोनाच्या विषाणूची गुणसूत्र हवेत सापडल्याने खळबळ माजलीय. जिथं कोरोनाचा जन्म झाला त्या वुहान शहरातील काही भागांतील हवेचे नमुने तपासल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय. वुहान शहरातील दोन रुग्णालयं आणि कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या काही ठिकाणांच्या हवेत कोरोनाची गुणसूत्र आढळलीयत. त्यामुळे चिंतेत भर पडलीय. मात्र असं असलं तरी, हवेतून कोरोनाचे विषाणू संसर्ग करत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

हवेतला कोरोना विषाणू किती धोकादायक?

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असल्याने कोरोनाचे विषाणू कोणत्याही ठिकाणी सापडू शकतात. काच, दगड, लाकूड अशा वस्तूंवर कोरोनाचा विषाणू जिवंत राहत असल्याने त्यापासून जास्त काळजीची गरज आहे. मात्र हवेत सापडलेला विषाणू तुलनेने जास्त धोकादायक नसून हवेतील विषाणूंमुळे संसर्ग होतो याबाबत ठोस संशोधन नाही. मात्र तरीही गर्दीची ठिकाणं टाळणं, स्वच्छता राखणं अशा गोष्टी केल्यास हवेतील विषाणूंचा धोका टळू शकतो.

हवेत सापडणारा कोरोनाचा विषाणू जास्त धोकादायक नसला तरी, आपण काळजी घ्यायला हवी. कारण कोरोना आपली वाट बघत बसलाय. त्याला संपवायचं असेल तर त्याच्यापासून दूर राहायला हवं, आपण घरातच राहायला हवं. कारण रोग नवाय, त्याच्याविरोधातली लढाईही नवीच हवी.


संबंधित बातम्या

Saam TV Live