कोरोनाची परिस्थिती आणखी खराब होणार, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

साम टीव्ही
शुक्रवार, 26 जून 2020
 • भारत कोरोनाच्या परिस्थितीबाबत जगात 4 थ्या क्रमांकावर आहे.
 • भारतात सध्या 4 लाख 91 हजाराहुन अधिक रुग्ण आहेत.
 • तर 15 हजार 300 हुन अधिक लोकांना आपला जीव गमावलाय.
 • एकट्या महाराष्ट्रात 1 लाख 47 हजार 741 कोरोना रुग्ण आहेत.
 • तर 6 हजार 931 लोकांनी आपला जीव गमावलाय.

गेल्या ६ महिन्यापासून जग कोरोनाशी लढतंय. आता ही लढाई संपेल असं अनेकांना वाटतंय. पण आताशी लढाई सुरु झालीय. अजून कोरोनाचा कहर बरसणं बाकी असल्याचा इशारा देण्यात आलाय. कुणी दिलाय हा इशारा? पाहा...

जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका, रशिया, जापानसह भारतात कोरोनाचा कहर सुरुच आहे. पण, हा कहर आणखी वाढणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रोस एडनम घेब्रेसियस यांनी याबाबत वक्तव्य केलंय..युरोपात कोरोनाचा कहर कमी होताना दिसतोय. पण या महामारीची स्थिती आणखी घातक होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 • जगात सध्या 97 लाख 33 हजार 705 रुग्ण आहेत
 • कोरोनात 4 लाख 62 हजार 262 लोकांनी जीव गमावलाय
 • तर 52 लाख 66 हजार लोक यातून बरे झाले आहेत.
 • सध्या तब्बल 39 लाख 75 हजाराहुन अँक्टीव्ह कोरोना केसेस आहेत.

अमेरिकेत सध्या सर्वाधिक 25 लाख रुग्ण आहेत..तर 1 लाख 26 हजार लोकांनी एकट्या अमेरिकेत जीव गमावलाय. मात्र, इथं कोरोना रुग्ण सापडण्याचा प्रमाण कमी झालंय. युरोपातही कोरोनाचा प्रभाव आता कमी होताना दिसतोय. मात्र भारतासह इतर देशांमध्ये आता रुग्ण संख्या झपाट्यानं वाढतेय.

 • भारत कोरोनाच्या परिस्थितीबाबत जगात 4 थ्या क्रमांकावर आहे...
 • भारतात सध्या 4 लाख 91 हजाराहुन अधिक रुग्ण आहेत...
 • तर 15 हजार 300 हुन अधिक लोकांना आपला जीव गमावलाय..
 • एकट्या महाराष्ट्रात 1 लाख 47 हजार 741 कोरोना रुग्ण आहेत..
 • तर 6 हजार 931 लोकांनी आपला जीव गमावलाय..

कोरोना संकट वाढणार असल्याचं सांगतानाच पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेनं चीनची पाठराखण केली. वर्षभरापूर्वीच कोरोना व्हॅक्सिन आली असती, जर चीननं माहिती लपवली नसती, असं वक्तव्य इथोओपियांच्या माजी आरोग्य मंत्र्यांनी केलं. मात्र, हे वक्तव्य चुकीचं असल्याचं WHO नं सांगितलं. शिवाय कोरोना प्रतिबंधासाठी चीननं केलेल्या उपायांचं WHO नं कौतुक केलंय. त्यामुळं WHO चीनच्या ताटाखालचं मांजर झालंय, हे आता स्पष्ट आहे.

चीन कोरोना आणि जागतिक आरोग्य संघटनेचा भंपकपणा हे समीकरण जगासाठी घातक ठरताना दिसतेय. त्यामुळं जगातील इतर देशांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना करायला हवा. आणि कोरोनाच्या परिस्थितीनंतर या चीनना चारी मुंड्या चीत करायला हवं. तरंच पुन्हा जग नव्या संकटात सापडणार नाही....
 


संबंधित बातम्या

Saam TV Live