GOOD NEWS | मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर घटला, राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

साम टीव्ही
गुरुवार, 16 एप्रिल 2020

गेल्या 11 दिवसातला हा सगळ्यात कमी मृत्यू दर आहे. पालिका प्रशासन, आरोग्य विभाग यासगळ्यांसह प्रत्येकजण कोरोनाविरोधात लढा देतोय. या लढ्याहा अल्पशा प्रमाणात का होईना, पण आता यश मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. यामुळे सगळ्यांनीच धसका घेतलाय. पण या सगळ्यात एक दिलासादायक वृत्त समोर येतंय. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत 35 टक्क्यांनी घट झाली आहे. तर मृत्यूदरही कमी झालाय. बुधवारी मुंबईत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. गेल्या 11 दिवसातला हा सगळ्यात कमी मृत्यू दर आहे. पालिका प्रशासन, आरोग्य विभाग यासगळ्यांसह प्रत्येकजण कोरोनाविरोधात लढा देतोय. या लढ्याहा अल्पशा प्रमाणात का होईना, पण आता यश मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

यासह राज्यातही गेल्या ४ दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालीय. त्यामुळे आता कदाचित थोडा दिलासा मिळू शकतो. 

राज्यात आज 232 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णं आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा 2 हजार 916 वर पोहोचलाय. तर दिवसभरात राज्यात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याशिवाय 36 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले असून राज्यातली आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या 295 वर गेलीय. आतापर्यंत राज्यात 52 हजार संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. 

यासह आणखी एक दिलासादायक बाब आहे. केरळ या राज्याची जवळपास कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. बुधवारी केरळमध्ये कोरोनाचा फक्त एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलाय. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांना बरं कऱण्यातही केरळ सरकारला मोठं यश आलंय. सोशल डिस्टन्सिंग, वेळेत केलेल्या चाचण्या, आणि प्रशासनाच्या आवाहनाला लोकांनी दिलेली शिस्तबद्ध साथ याच्या जोरावर केरळमधील कोरोनाचा धोका जवळपास संपत आला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. इतर राज्यांमध्ये केरळच्या मानाने रुग्ण उशीरा सापडले, पण तिथे कोरोनाचा वेगाने प्रसार झाला आणि कोव्हिड झालेल्या रूग्णांचे मृत्यूही अधिक संख्येने झाले. केरळने तातडीने उचललेली पाऊलं आणि कोव्हिडविषयीचा सर्वसमावेशक दृष्टीकोन यामुळे सरकारचं कौतुक होतंय. केरळमध्ये सध्या कोरोनाचे फक्त 167 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत फक्त 3 जणांना केरळमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर हा केरळमधील सर्वात कमी आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live