जगभरात 15 लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोनची बाधा, मृतांचा आकडा 91,000च्या पार

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

जगभरात 15 लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोनची बाधा झाली आहे. जगभरातील रुग्णांची संख्या 15 लाख 48 हजार 654 इतकी झालीय.

जगभरात 15 लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोनची बाधा झाली आहे. जगभरातील रुग्णांची संख्या 15 लाख 48 हजार 654 इतकी झालीय. तर मृतांचा आकडा 91 हजारावर गेला असून आतापर्यंत 91 हजार 538 लोकं दगावले आहेत. कोरोनाने इटलीत 18 हजारापेक्षा जास्त तर स्पेनमध्ये 15 हजारापेक्षा जास्त लोक दगावले आहेत. अमेरिकेतही आतापर्यंत 14 हजार 830 लोकांचा बळी गेलाय. फ्रान्समधील मृतांचा आकडाही 10 हजाराच्या वर गेला आहे.

 

यासह देशातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 865वर पोहचलीय. गेल्या 24 तासात 591 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 169 जणांचा मृत्यू झालाय.  सध्या 5218 लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेलीय, तामिळनाडू आणि राजधानी दिल्लीतला आकडा 700 पेक्षा अधिक झालाय. तेलंगणा, उत्तर प्रदेशातील रुग्णांची संख्या 400 हून अधिक झालीय. तर कोरोनावरील उपचारानंतर 478 जण ठणठणीत बरे झालेत.

जगाची अवस्था अशीच राहिली तर संपूर्ण जगाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे कोरोनावर लवकरात लवकर उपाय करणं अत्यंत महत्वाचं झालंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live