सावधान! नवी मुंबईसह आजुबाजुच्या शहरांत कोरोनाचा धोका वाढला...

साम टीव्ही न्यूज
रविवार, 5 एप्रिल 2020

सावधान... नवी मुंबईत कोरोनाचा धोका वाढलाय. ठाणे, कल्याण डोंबिवलीतही आकडा वाढताच शेजारच्या पनवेलमध्येही कोरोनाचा धुमाकूळ
 

मुंबईला कोरोनानं पछाडलंय हे खरंय मात्र आता नव्या मुंबईला कोरोनाचा जास्त धोका असल्याचा पाहायला मिळतोय. म्हणून वेळीच सावध राहणं गरजेचं आहे. नवी मुंबईत कोरोनाचा धोका वाढलाय. फक्त नवी मुंबईतच नाही तर नवी मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांतही कोरोनानं डोकं वर काढलंय.

चकाचक रस्ते, उत्तम सुविधा, प्रवासाची मुबलक साधनं, गार्डन, मॉल्स, थिएटर्ससारखी मनोरंजनाची मुबलक साधनं अशी नवी मुंबईची ओळख गेल्या काही वर्षांत बनून गेलीय. त्याचसोबत कॉर्पोरेट्सचं नेक्स्ट डेस्टिनेशन अशीही नवी ओळख नवी मुंबईला लाभलीय. पण आता हेच कॉर्पोरेट्सचं नेक्स्ट डेस्टिनेशन कोरोनाच्या गर्तेत सापडलंय. कारण नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 वर पोहोचलाय.

 नवी मुंबई कोरोनाच्या कचाट्यात

वाशी येथे कोरोनाचे 12 रुग्ण सापडले असून नेरूळ येथे 8 जणांना कोरोनाची लागण झालीय. कोपरखैरणे आणि ऐरोलीत कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर तिकडे खारघरला केंद्रीय सुरक्षा बलाच्या 11 जवानांना कोरोनाची लागण झालीय. कामोठे येथे दोघांना आणि खारघर येथेही दोघांना कोरोनाची लागण झालीय. त्याचप्रमाणे नवी मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 78  वर पोहोचलाय.
स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्टात पहिला आणि देशात सातवा क्रमांक पटकावणारी नवी मुंबई कोरोनाच्या जाळ्यात अडकलीय. याचाच अर्थ असा होतो की कोरोनाचा राक्षस धर्म, जात, प्रांत असलं काहीही बघत नाही. जो सापडेल त्याला कचकटून पकडतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी घरात बसून मीच माझा रक्षक या मंत्राचं पालन करायला हवं.

Web Title - marathi news corona effect in new mumbai and mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live