VIDEO | आता कोरोनामुळे महाराष्ट्रातील देवस्थानही बंद, पाहा कोणकोणत्या मंदिरांना टाळं

साम टीव्ही
मंगळवार, 17 मार्च 2020

आता बातमी कोरोनामुळे देव आणि भक्तांच्या झालेल्या ताटातुटीची. कोरोनामुळे महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरं बंद ठेवण्यात आलीयत. त्यामुळे भाविकांना आता घरातूनच देवाचा धावा करावा लागणार आहे. पाहुयात साम टीव्हीच्या स्पेशल रिपोर्टमधून.

तुकोबांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेल्या या अभंगाचे बोल आता आपल्याला खऱ्या अर्थाने कृतीत आणावे लागणारेत. कारण कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांमध्ये देवदर्शन बंद करण्यात आलंय. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं थेट दर्शन 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आलंय, त्याचप्रमाणे विठोबा मंदिरातील अन्नछत्रही बंद करण्यात आलंय. अष्टविनायकांपैकी एक पालीच्या बल्लाळेश्वराचंही दर्शन 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणारेय. महडच्या गणपती बाप्पाचंही दर्शन बंद करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पर्यटकांसह भक्तांचा नेहमी ओढा असलेल्या एलिफण्टा लेणीही पाहता येणार नाहीत.
 

कोरोना व्हायरसचा असाही फटका भाविकांना सोसावा लागतोय. पण, संत तुकोबांनी अभंगात सांगितल्याप्रमाणे आपला देहच देवाचं मंदिरय आणि म्हणूनच कोरोनापासून देहाला वाचवण्यासाठी तूर्तास घरातूनच देवाचा धावा करूयात.


संबंधित बातम्या

Saam TV Live