भयंकर! मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, 35 वर्षीय डॉक्टरला कोरोना

मोहिनी सोनार
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

मुंबईतली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी परिसरात कोरोनाने शिरकाव केलाय. या ठिकाणी आणखी एकाला कोरोनाची लागण झाली असून हा व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती मिळतेय. एका ३५ वर्षीय डॉक्टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.

महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झालाय. आणि आतापर्यंत अनेकांचे मृत्यूही झालेत. त्यातल्या त्यात मुंबईत कोरोनाची प्रचंड भिती आहे. कारण मुंबईत लोक दाटीवाटीने राहतात. त्यातच आता धक्कादायक माहिती समोर येतेय की, ुंबईतील धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झालाय.

मुंबईतली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी परिसरात कोरोनाने शिरकाव केलाय. या ठिकाणी आणखी एकाला कोरोनाची लागण झाली असून हा व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती मिळतेय. एका ३५ वर्षीय डॉक्टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.

दरम्यान रुग्णाच्या संपर्कात आल्याने या डॉक्टरला कोरोना झाल्याचं बोललं जातंय. सध्या या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबालाही क्वॉरंटाईन करण्यात आलं असून आज त्यांचीही चाचणी करण्यात येणारेय. मात्र यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून सुरक्षेच्या कारणास्तव हा परिसर बीएमसी कर्मचाऱ्यांकडून सील करण्यात आलाय. 

ज्या अर्थी त्या डोक्टरला रुग्णाच्या संसर्गानं कोरोना झाल्याचं कळतंय त्या अर्थी तो रुग्ण नेमका कोण आणि असेल तरी तो आणखी किती जणांच्या संपर्कात आला असेल. यावरुन आपण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊ शकतो. धारावीत भली मोठी झोपडपट्टी आहे. या परिसरात नागरिक खूप दाटीवाटीने राहतात. अशात एखाद्याला कोरोना झाला तर तो किती जणांच्या संपर्कात येईल आणि किती भयंकर प्रकारे तो पसरेल याची कल्पना करवत नाही. 

 

 

परिसरातील लोक लॉकडाऊनला प्रतिसाद देत नाहीत

मागे याच परिसरात काही लोकांनी चक्क पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्यामुळे प्रशासनाने या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही काही काम करण्याचा निर्णय घेतला तरी तिथले लोक त्याला प्रतिसाद देतील की, नाही हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं असं आवाहन करण्यात येतंय.

Web Title - marathi news corona enters in mumbai dharavi slum area 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live