धक्कादायक! मुंबई आणि पुण्यात कोरोनाची एन्ट्री, रुग्णांची संख्या 5वर

मोहिनी सोनार
मंगळवार, 10 मार्च 2020

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या आता पाचवर गेलीय. दुबईतून आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल  केलंय. त्यातच आता या दाम्पत्याच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. त्याशिवाय या दाम्पत्याला मुंबईतून पुण्याला घेऊन आलेल्या टॅक्सी ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाल्याचं दिसून आलंय..त्याला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याशिवाय या दाम्पत्यासोबत विमानात प्रवास केलेल्या व्यक्तीलाही या आजाराची लागण झालीय. पुण्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता पाचवर गेलीय. आणि मुंबईतही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती मिळतेय.

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन संशयित रुग्ण‍ आढळून आले होते. दोन्ही रुग्णांना नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मुलीला देखील कोरोना झाल्याचं समोर आलंय. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशात 57वर पोहोचली आहे. तर आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्रात या कोरोनाबाधितांची संख्या 5 वर पोहचली आहे. एवढच नाही तर कोरोनाबाधित दाम्पत्याला ज्या ड्रायव्हरने मुंबईहून पुण्याला सोडलं तो, सुद्धा पॉझिटीव्ह झालाय. आणि तो मुंबईचा असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय. त्यामुळे आता ओरोग्य विभागाला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 

हे ही पाहा - #Corona बाधितांची संख्या 5 वर, कोरोना अतिवेगाने पसरण्याची शक्यता

  

त्य़ातल्या त्यात मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यास अतिशय वेगाने तो पसरेल अशी चिन्हं आता दिसतायत. त्या दृष्टीनं प्रशासनानं प्रयत्न केले पाहिजे. दरम्यान या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. आणि नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही. होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गांवोगांव भरणा-या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

Web Title - marathi news corona Entrs in Mumbai and pune


संबंधित बातम्या

Saam TV Live