कोरोनावर पहिलं प्रभावी औषध, मृत्यूचं प्रमाण एक तृतीयांशानं कमी

साम टीव्ही
बुधवार, 17 जून 2020
  • कोरोनावर पहिलं प्रभावी औषध शोधण्यात यश
  • गंभीर रुग्णांसाठी सर्वाधिक उपयुक्त
  • मृत्यूचं प्रमाण एक तृतीयांशानं कमी

आणि आता अख्ख्या जगाला दिलासा देणारी बातमी. कोरोनावर प्रभावी असणारं एक औषध ब्रिटननं शोधलंय. नक्की कसं काम करतं हे औषध. तुम्हीच पाहा.

कोरोनावर रामबाण ठरणारी लस शोधण्याचं काम साऱ्या जगात युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच ब्रिटनला कोरोनावर एक प्रभावी औषध शोधण्यात यश आलंय. काही गंभीर रुग्ण या औषधामुळे बरे झाल्याचं दावा ब्रिटननं केलाय. हे औषध एक प्रकारचं उत्तेजक आहे. डेक्सामिथासोन असं या औषधाचं नाव आहे.

कोरोनावर डेक्सामिथासोन प्रभावी ? 

  • हे उत्तेजक शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं
  • श्वसनाशी संबंधित समस्या कमी करण्यावर प्रभावी औषध
  • या औषधाच्या वापरामुळे गंभीर रुग्णांतील मृत्यूचं प्रमाण एक तृतीयांशानं कमी झालंय
  • व्हेंटिलेटरवर असलेले एक तृतीयांश आणि ऑक्सिजनवर असलेले एक पंचमांश रुग्ण या औषधामुळे बरे झाले. कमी लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये हे औषध फारसं प्रभावी ठरत नाही
  • डेक्सामिथासोन हे औषध कमी खर्चिक असल्याचाही दावा ब्रिटननं केलाय. जगभरात कोरोनामुळे दररोज हजारो मृत्यू होतायंत. हे मृत्यू रोखण्यासाठी हे औषध रामबाण इलाज ठरण्याची शक्यता आहे. आशा करुयात लवकरात लवकर साऱ्या जगात या औषधाचा वापर सुरु होईल आणि हजारो प्राण वाचतील.
     


संबंधित बातम्या

Saam TV Live