कोरोना रुग्णाची गळ्यावर ब्लेडने वार करुन आत्महत्या

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 11 एप्रिल 2020

एका कोरोना रुग्णानं आपल्या गळ्यावर ब्लेडनं वार करत आत्महत्या केलीय.

आता एक धक्कादायक बातमी अकोल्यात घडलीय.  एका कोरोना रुग्णानं आपल्या गळ्यावर ब्लेडनं वार करत आत्महत्या केलीय. अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून दि.७ एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला असे अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला यांनी कळवले आहे. मयत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम (वय ३०वर्षे) असे असून तो मूळचा सालपडा जि. नागाव, आसाम येथील रहिवासी आहे. काल  आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.
यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे. अकोल्यातल्या सर्वोपचार रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडलीय.  ही घटना घडल्यानंतर त्याच्यावर तातडीनं उपचार सुरु करण्यात आले .मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा रुग्ण मूळचा आसामचा असल्याचं कळतंय. सध्या या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस करताहेत..
दरम्यान, अशीच एक घटना सेलू इथंही घडलीय. मात्र किथे कोरोनाच्या भीतीमुळे आणि वादातून एका महिलेनं आत्महत्या केली होती. एका हातगाड्यावरुन भाजी-पाला खरेदी केल्यामुळे रागाच्या भरात, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सेलूमध्ये घडली. सेलू शहरातील पारिजात कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. काल सकाळी आत्महत्या करणाऱ्या महिलेने.. नवऱ्याला बाजारातून भाजीपाला आणण्यास सांगितले होते. परंतू त्यांनी भाजीपाला बाजारातून न आणता रस्त्यावरील हातगाडीवरुन खरेदी केला. आणि याच क्षुल्लक कारणावरुन आधी पती-पत्नीमध्ये वाद झाला. आणि त्याच रागात विवाहितेने राहत्या घरातून गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, कोरोना विषाणुच्या भितीतून हा प्रकार घडला असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

Web title - marathi news corona patient suicide by a blade hit the his neck


संबंधित बातम्या

Saam TV Live