कोरोनाची दहशत संपेना! वाचा जगासह देशभरात सध्या कोरोनाचे किती रुगण...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 मार्च 2020

सध्या कोरोनामुळे सगळीकडेच हाहाकार माजलाय त्यातच कोरोना रुग्णांचा वाढचा आकडा पाहता मोठआ धस्काच सर्वांनी घोतलाय. दरम्यान कुठे किती रुग्ण वाढतायत ते पाहा या बातमीत...

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका आणि आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 727 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 
संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 85,435 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. मात्र, तरीदेखील सध्या भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. सध्या ७२७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये २० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
दरम्यान, राज्यात मुंबई, पुणे, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण असतानाच शुक्रवारी सकाळी गोंदियातील एका संशयित व्यक्तीचा वैद्यकीय तपासणी अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. 


संबंधित बातम्या

Saam TV Live