तबलिगींमुळे बीडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 एप्रिल 2020

बीडमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता मात्र, दिल्ली येथील तबलीगी जमातमध्ये सहभाग घेतलेल्या १२ जणांपैकी आठ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे बीडकरांची चिंता वाढलीय.

बीड : आतापर्यंत कोरोना उपाय योजनांच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व सामान्यांकडून पालन होत असताना आणि रविवार पर्यंत कोरोना रुग्णांबाबत शुन्यावर असलेल्या बीडकरांची आता काळजी वाढली आहे.

तबलीगी जमात मधील १२ जणांचा जालना जिल्ह्याच्या हद्दीतून उस्मानाबाद जिल्हा हद्दीत प्रवेश करताना शहागड व चौसाळा चेकपोस्ट येथील पोलिसांशी संपर्क आल्याचा संशय आहे. त्यामुळे २८ पोलिसांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातील काहींचे गरजेनुसार स्वॅबही घेतले जाणार आहेत.

दिल्ली येथील तबलीगी जमातमध्ये सहभाग घेतलेल्या १२ जणांपैकी आठ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हे लोक जालनाहून लातूरकडे जाताना त्यांना बीड पोलिसांनी शहागड चेकपोस्टवर अडविले. त्यावेळी त्यांनी पोलिसांसोबत हुज्जतही घातली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मार्गे जिल्हा हद्दीतून उस्मानाबदकडे प्रवेश करताना चौसाळा येथील चेकपोस्टरही त्यांचा पोलिसांशी संपर्क आला होता. या दोन्ही ठिकाणच्या पोलिसांना तातडीने आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले आहे. गरजेनुसार या पोलिसांचे स्वॅबही घेतले जाणार आहेत. या लोकांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचा आकडा २८ आहे.

बीडचा बेत फसल्याने शहागडला मुक्काम

दरम्यान, तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेले हे लोक जालनाहून निघून बीडला मुक्काम करणार होते. परंतु, जिल्ह्यातील १४ ठिकाणी चेकपोस्ट करुन तपासणी करण्यात येत होती. यातील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहागड चेकपोस्ट येथे रात्रीच्या वेळी पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी या लोकांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. परंतु, परत फिरावे लागल्याने त्यांनी शहागडला मुक्काम केला. दरम्यान, दुसऱ्या मार्गाने त्यांनी लातूरला जाताना पुन्हा त्यांना चौसाळा चेकपोस्टवर अडविले. या दोन्ही वेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

Web Title - marathi news corona patients increasing in beed due to tabligi resion


संबंधित बातम्या

Saam TV Live