फाईव्ह स्टार ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचे 6 रुग्ण आढळले

साम टीव्ही न्यूज
रविवार, 12 एप्रिल 2020

मुंबईतल्या नामांकित फाईव्ह स्टार ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या हॉटेलच्या किमान सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली

मुंबईतल्या नामांकित फाईव्ह स्टार ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या हॉटेलच्या किमान सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून सर्वांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ताज महल पॅलेसमधील काही कर्मचाऱ्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे... त्यांच्यावर आवश्यक उपचार तातडीने सुरू करण्यात आले आहेत आणि सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे.. मुंबईतीलच कोरोना बाधित रुग्णाचा संपर्क झाल्याने ताजच्या कर्मचाऱ्यांना लागण झाली असण्याची शक्यता आहे. ताज मुक्कामी असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसचीदेखील आता तपासणी करावी लागणार असून ताजमधील या कर्मचाऱ्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करावे लागणार आहे. 

मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत असताना दक्षिण मुंबईतील पंचतारांकित ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ताज हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ताज महल पॅलेसमधील सहा कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच ताज हॉटेलमध्ये औषध फवारणी केली जात आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, एका दिवसात १३८ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ११८२ वर पोहचला आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची घोषणा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.


संबंधित बातम्या

Saam TV Live