देशातून महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त, नवी मुंबई, कामोठे, कल्याणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह केसेस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई - जगभरात कोरोनाने हातपाय पसरलेत. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत चाललाय. आज दुपारपर्यंत (१४ मार्च) महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा २२ होता. हाच पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा आता २६ वर गेलाय. याबाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत माहिती दिलीये. महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 

काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे : 

आजच्या मितीला २६ पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुण्यात १०,  मुंबईत ५, कामोठे(पनवेल) मध्ये १, कल्याणमध्ये १ नवी मुंबईमध्ये १, नागपूर ४, अहमदनगर १, ठाणे १, यवतमाळ २ असे एकूण २६ रुग्ण आहेत.       

कोरोनाचं संकट महाराष्ट्र आणि भारतावर घोंघावतंय. अशात महाराष्ट्रात दररोज कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा कॉलेजेस अंगणवाड्या या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आलेत. यासंबंधीचा GR देखील सरकारने काढलाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी जमू नका, गर्दीची ठिकाणं टाळा असं सुचवण्यात आलंय. नागपूर, मुंबई , नवी मुंबई , ठाणे , पुणे , पिंपरी चिंचवड याठिकाणची नाट्यगृह, सिनेमागृह, जिम, व्यायामशाळा , स्विमिंग पूल बंद करण्यात आलेत.    

Web Title: marathi news  Corona-positive cases are most corrupted in Maharashtra, Navi Mumbai, Kamothe, Kalyan

संबंधित बातम्या

Saam TV Live