होळीच्या सणावर कोरोनाचं सावट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 मार्च 2020

अचलपूर : शोसल मीडिया कधी कोणाचा गेम करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी चिकन खाल्ल्याने कोरोना होत असल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता, तर आता चायनाचे रंग, फुगे, पिचकाऱ्या आदी वस्तू वापरल्यास कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचा मॅसेज वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे व्यावसायिक तथा रंगपंचमी साजरी करणारे चांगलेच धास्तावलेले आहेत.

अचलपूर : शोसल मीडिया कधी कोणाचा गेम करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी चिकन खाल्ल्याने कोरोना होत असल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता, तर आता चायनाचे रंग, फुगे, पिचकाऱ्या आदी वस्तू वापरल्यास कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचा मॅसेज वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे व्यावसायिक तथा रंगपंचमी साजरी करणारे चांगलेच धास्तावलेले आहेत.

सोशल मीडियावर आधी पोल्ट्रीफॉर्म

रंगपंचमीचा सण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजली आहेत. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र, यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. कारणही तसेच आहे. सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज वेगाने व्हायरल होत आहे. या मॅसेजमुळे रंगपंचमी खेळण्याच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. बाजारपेठेत मिळणारे बहुतांश रंग, फुगे, पिचकाऱ्या आदी वस्तू चायनावरून येत असल्याचे म्हटले आहे. सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालतोय. अशातच तेथील वस्तू किंवा रंग वापल्यास आपल्यालाही कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. या मॅसेजमुळे अनेकांच्या मनात आतापासूनच धडकी भरली आहे. यापूर्वीसुद्धा चिकनच्या संबंधित मॅसेज व्हायरल झाला होता. त्याचा परिणाम म्हणून चिकन व्यावसायिकांचा खप अर्ध्यावर आला आहे. कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सध्याही चिकनचा खप पाहिजे तसा वाढला नाही, आता धूलिवंदन येत्या चार-पाच दिवसांवरच येऊन ठेपले असतानाच नवा मॅसेज व्हायरल होत आहे. 

रासायनिक रंगांचे दूरगामी परिणाम

 नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. त्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल. या रंगांमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्‍साइड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनिअम ब्रोमाइड, पर्शियन नीड, मर्क्‍युरी सल्फाइड आदी विषारी रसायने टाकलेली असतात. या रसायनांमुळेच हे रंग अधिक गडद होतात व दीर्घकाळ टिकतात. मात्र या रंगांचे काही परिणाम तात्काळ दिसून येतात, तर काही दीर्घकाळाने जाणवतात. या रंगांमुळे त्वचेची आग होते तर डोळ्यांची जळजळही तत्काळ जाणवते. मात्र दूरगामी परिणाम यापेक्षा गंभीर आहेत.

रासायनिक रंगांमुळे त्वचेचे विविध आजार होऊ शकतात. डोळ्यांना सूज व तात्पुरतेच आंधळेपणा यासारखे घातक परिणाम होऊ शकतात. सोबतच त्वचेचा कर्करोगही या रंगांमुळे होऊ शकतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यंदा नैसर्गिक रंगाची रंगपंचमी साजरी करा अन्‌ आरोग्याचीही काळजी घ्या.
-डॉ. हर्षराज डफडे, त्वचारोग तज्ज्ञ.

Web Title  Corona Sauce At Holi Festival


संबंधित बातम्या

Saam TV Live