5 वर्षांखालील मुलांमुळे पसरतोय कोरोना? तज्ज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

साम टीव्ही
शुक्रवार, 31 जुलै 2020
  • लहान मुलं पसरवतायत कोरोना?
  • ५ वर्षांखालील मुलांमुळे पसरतोय कोरोना?
  • तज्ज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, तर ही बातमी, तुमच्या चिंतेत भरच घालेल. कारण एका अहवालानुसार, ५ वर्षांखालील मुलांमुळे कोरोना वेगाने पसरतोय.

कोरोना व्हायरसबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलेय. लहान मुलांकडून कोरोनाचा प्रसार अधिक होतो, असं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलंय. जर्मनीच्या फ्रँकफर्ट इथे जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केलाय. 

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याला आता ६ महिने उलटलेत. आतापर्यंत या व्हायरसने ७ लाख लोकांचा जीव घेतलाय. अशात या रिसर्चमधून समोर आलेल्या गोष्टी चिंतेत भर घालणाऱ्या आहेत.

23 मार्च ते २७ मार्च दरम्यानचा हा रिसर्च आहे. लहान मुलांच्या रुग्णालयातून स्वॅब घेण्यात आले. शिकागो, इलिनॉयमधील रूग्ण, बाह्यरुग्ण, आपत्कालीन विभाग यांची चाचणी करण्यात आली. या अभ्यासानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या रिसर्चनुसार ५ वर्षांखालील मुलांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याचं पुढे आलंय. त्यामुळे या लहान मुलांमुळे तर कोरोनाचा ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत नाहीये, ना याचा तपास तज्ज्ञ करतायत.


संबंधित बातम्या

Saam TV Live