भारतात आतापर्यंत 2 हजार 69 जणांना कोरोनाची लागण,तर 53 जणांचे मृत्यू

मोहिनी सोनार
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

भारतात कोरोनाचा संचार झाल्यापासून परिसथिती गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस वाढती आकडेवारी समोर येतेय. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही हबकल्या आहे. पाहा कोरोनाग्रस्तांचा सध्याचा आकडा काय आहे... 

भारतात कोरोनाचा संचार झाल्यापासून परिसथिती गंभीर बनत चालली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. दिवसेंदिवस वाढती आकडेवारी समोर येतेय. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही हबकल्याआहे. 

दरम्य़ान, भारतात आतापर्यंत २ हजार ६९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तर कोरोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला असून १५५ लोकं ठणठणीत बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलीय. दरम्यान महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. तर दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची आकडेवारीही चिंताजनक असल्याचं समोर आलंय.

कोरोनाला वेळीच नाही, रोखलं तर आपली स्थिती सुद्धा इटलीसारखी व्हयला वेळ लागणार नाही. तिथे आतापर्यंत लाखो कोरोनाचे रुग्ण आहेत तर हजारोंच्या संख्येत मृत्यूही होतायत. यामुळे आपण वेळीच सतर्क होणं खूप महत्वाचं आहे. सोशल डिस्टन्सींगचं पालन करुन योग्य ती काळजी घेणं महत्वाचं आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी या सर्व गोष्टींचा फज्जा उडताना पहायला मिळतोय. कुठे तर पोलिसांवरच हल्ले होताना दिसताय. त्यामुळे नागरिकांनी स्वत: स्वत:चा जीव कसा वाचवता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Web Title -  marathi news corona update in india - 2069 corona patient and 53 deaths in country
 


संबंधित बातम्या

Saam TV Live