महाराष्ट्रात परिस्थिती बिकट! असंच चाललं तर, कोरोनाचा तिसरा टप्पा गाठायला वेळ लागणार नाही

साम टीव्ही
शनिवार, 4 एप्रिल 2020

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. आता संख्या 490 झालीय. दरम्यान असंच चालत राहिलं तर राज्यात लवकरच कोरोनाचा तिसरा टप्पा पार होईल.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 490 वर पोहचलाय. मुंबईत आज 43 रूग्णांची वाढ झालीय. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 278 वर पोहचलाय. पुण्यात 9, नवी मुबंईत 8, नगरमध्ये 3 नवीन रूग्ण आढळले आहेत. तर पालघर, वाशिम, कल्याण आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक एक रूग्ण आढळलाय.  काल दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मत्यू  झालाय... काल दिवसभरात 88 रूग्णांची वाढ झाली होती. काल 67 रूग्ण वाढले आहेत.आता लोकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 

हेही पाहा -

VIRAL SATYA | दाढी मुळे मास्कचा प्रभाव घटतो ?

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये चार जणांचा झाला आहे. मुंबईत तिघांचा आणि ठाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मरण पावलेल्यांची संख्या आता 26 झाली आहे. राज्यात 595 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12 हजार 858 नमुन्यांपैकी 11968 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तर 490 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 50 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Web Title - Corona Update In maharashtra. we are near by third step of corona 


संबंधित बातम्या

Saam TV Live