बिगबींसह अभिषेक बच्चनला कोरोना! कोरोनाचा कहर सुरुच, तर एकाच दिवशी तब्बल 28 हजार कोरोनाबाधित

साम टीव्ही
रविवार, 12 जुलै 2020

एकीकडे अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यांना लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, त्यांच्या घरात काम करणाऱ्या इतरांचे रिपोर्ट येणं अजून बाकी आहे.

देशात गेल्या 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 28 हजार 637 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेत. यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 लाख 49 हजार 553 वर पोहचलीय.  सध्या देशभरातील विविध रुग्णालयात 2 लाख 92 हजार 258 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 5 लाख 34 हजार 621 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर गेल्या 24 तासात 551 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय. आतापर्यंत देशात 22 हजार 674 रूग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय.

तर राज्यात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक झालाय. राज्यात काल 8 हजार 139 नव्या रुग्णांचं निदान झालंय. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 46 हजार 600 एवढी झालीय. दुसरीकडे कोरोनामुळे काल 223  रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृतांचा आकडा 10 हजारांवर गेलाय दरम्यान काल 4 हजार 360 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत तर सध्या राज्यात कोरोनाचे 99 हजार 202 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

एवढच काय अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना टेस्टचा दुसरा रिपोर्ट आज येणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय. काल सगळ्यात आधी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर लगेचच अभिषेक बच्चनलाही लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तातडीनं त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि नात आराध्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आलाय. तर अमिताभ यांच्या घरातील स्टाफचीही चाचणी करण्यात आली आहे.

एकीकडे अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यांना लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, त्यांच्या घरात काम करणाऱ्या इतरांचे रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. अमिताभ किंवा अभिषेकमुळे अजून कुणाला संसर्ग झालाय का, हे आता येणाऱ्या टेस्ट रिपोर्ट्सवरुनच स्पष्ट होईल. त्यांच्यापैकी कुणाला लागण झाली आहे का, हे पाहणं आता महत्त्वाचंय. अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानं चाहत्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र त्यांना अजूनतरी कोणतीही लक्षणं नाही आहे. 77 वर्षांच्या अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावेत यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live