आजचे कोरोनाचे अपडेट्स, वाचा कुठे किती रुग्ण वाढले?

आजचे कोरोनाचे अपडेट्स, वाचा कुठे किती रुग्ण वाढले?

देशात कोरोना रुग्णांची संख्या 9 लाखाच्या वर गेलीय. देशात गेल्या 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 28 हजार 498 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेत. यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 लाख 06 हजार 752 वर पोहचलीय.
सध्या देशभरातील विविध रुग्णालयात 3 लाख 11 हजार 565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 71 हजार 460 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर गेल्या 24 तासात 553 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय. आतापर्यंत देशात 23 हजार 727 रूग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय.

काल राज्यात कोरोनाच्या 6 हजार 497 रुग्णांचं निदान झालंय. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 60 हजार 924 इतकी झालीय. सोमवारी राज्यात 193 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर कालच्या एका दिवसात 4 हजार 182 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. 

मुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण, तर ४७ जणांचा मृत्यू मुंबईमध्ये १ हजार १७४ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९३ हजार ८९४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५३३२ वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये आज १ हजार १७४ नवे रुग्ण सापडले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३१ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ६ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ४७ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत. मुंबईत कोरोनाचे ९३४ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजार ५५० वर पोहचली आहे. तसेच ७५० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ६५ हजार ६२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

कल्याणमध्ये सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय... जवळपास आता दररोजच सहाशेपेक्षा अधिक कोविड रुग्ण समोर येत असल्याने रुग्णालयं कमी पडू लागली आहेत... अशातच आता सर्वसामान्यांसाठी असलेली हॉस्पिटल्ससुद्ध, सरकारकडून मिळणाऱ्या पैशांसाठी आणि रुग्णांकडून अधिक पैसे उकळण्याकरता,  कोव्हिड रुग्णालयं होत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय... टिळक चौक या दाट लोकवस्ती असलेल्या भागातील वैद्य रुग्णालयात कॅन्सर आणि किडनीच्या रुग्णांवर उपचार होतात... मात्र सध्या या रुग्णालयाला कोविड सेंटरमध्ये बदलण्यात आल्याने स्थानिकांनी याला विरोध केलाय... तसंच या प्रकरणी महापालिकेला निवेदन देखील सादर केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com