कोरोनाच्या लसीचं परीक्षण सुरु, पहिली लस टोचण्याची हिंमत एका महिला शास्रज्ञानं दाखवली...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 एप्रिल 2020

कोरोनाची पहिली लस टोचण्याची हिंमत एका महिला शास्रज्ञानं दाखवली आहे. या लसीचा पहिला प्रयोग या रणरागिणीवर करण्यात आलाय. इंग्लंडमधील सूक्ष्मजीवशास्रज्ञ एलिसा ग्रॅनाटोनं ही लस स्वत: ला टोचवून घेतलीय.

कोरोनाची पहिली लस टोचण्याची हिंमत एका महिला शास्रज्ञानं दाखवली आहे. या लसीचा पहिला प्रयोग या रणरागिणीवर करण्यात आलाय. इंग्लंडमधील सूक्ष्मजीवशास्रज्ञ एलिसा ग्रॅनाटोनं ही लस स्वत: ला टोचवून घेतलीय. एलिसासोबतच कर्करोग संशोधक एडवर्ड ओडोनिल यांनाही ही लस टोचली गेलीय. आता पुढचे 48 तास एलिसासाठी महत्त्वाची असणार आहे. या दोघांवर हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इंग्लंडमधल्या कोरोनाग्रस्तांना ही लस दिली जाणार आहे. मानवजातीच्या रक्षणासाठी ही लस यशस्वी होणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय .त्यामुळं सगळ्या जगाचे डोळे आता ब्रिटनकडे लागले आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील अनुभवी आणि ज्येष्ठ वैज्ञानिकांनी करोना विषाणूशी लढणारी लस तयार केली आहे. ही लस किती उपयुक्त आहे आणि तिचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात, या संदर्भातील प्रयोग सुरू झाले आहेत. लंडनमधील एका बत्तीस वर्षीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाच्या शरीराला सर्वप्रथम ही लस गुरुवारी टोचण्यात आली.

जीवघेण्या करोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी सर्व जग एकवटले आहे. लंडनमध्ये करोनाच्या विषाणूचा मुकाबला करणारी लस तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे. मानवाच्या शरीरासाठी ही लस मानवी कितपत उपयुक्त आहे आणि करोनाशी लढण्यात फायदेशीर आहे का, याचे प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी एकूण आठशे जणांना ही लस टोचण्यात येणार आहे. हे सर्व जण अठरा ते ५५ या वयोगटातील आहेत.

Web Title - marathi news Corona vaccine testing begins


संबंधित बातम्या

Saam TV Live