सावधान! कोरोना लस बनवण्याची अतिघाई पडेल महागात 

साम टीव्ही
रविवार, 31 मे 2020
  • लस बनवण्याची अतिघाई पडेल महागात 
  • अतिघाई घेल्यास स्वप्नच बनून राहणार कोरोनाची लस 
  • तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगात हाहाकार माजवलाय. अशातच अमेरिका, इस्राईल, ब्रिटनसह अनेक देशांनी व्हॅक्सीन बनवण्याचा दावा केलाय. या दाव्यांमध्ये खरंच तथ्थ्य आहे का? 
लस बनवण्यात यश आलंय का? याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सारं जग कोरोनावरील लसीची प्रतीक्षा करतंय. अनेक देशांमध्ये लस बनवण्यावर संशोधन सुरू आहे. ब्रिटन, इस्त्राईल, अमेरिका या देशांनी तर कोरोनाची लस विकसीत झाल्याचा दावा केलाय. पण जरा थांबा, गार्डियननं कोरोनावरच्या लसीबाबत एक धक्कादायक माहिती दिलीय. 

गार्डियनने तज्ज्ञांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड तयार करत असलेल्या लसीबाबत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शंका व्यक्त केलीय. आपण इतक्यात लस बनवू शकणार नाही असं त्यांनी म्हंटलंय. त्याला संशोधकांनीही दुजोरा दिलाय. गार्डियनच्या माहितीनुसार लस तयार करणं हे अतिशय गुंतागुंतीचं आणि तांत्रिक स्वरुपाचं काम आहे. मुख्यत: लसीचं  कार्य संसर्ग शरीरात जाण्यापासून रोखणं, त्याचा प्रसार थांबवणं आणि कमीतकमी हानी करणं, हे असतं. आणि ही तिन्हीही कामं सुरक्षितपणे व्हायला हवीत. अस म्हंटलं जातं की व्हायरसचा खात्मा करण्यासाठी लस वेगानं अँटीबॉडीज तयार करेल. तसंच टी सेल संक्रमित पेशींचाही खात्मा करेल प्रत्येक लस दुसऱ्या लसीच्याच्या तुलनेत भीन्न असते. टी सेलमध्ये वेगानं होणाऱ्या वृद्धीचाही धोका आहे. यामुळे व्यक्तीला जीवघेण्या कॅन्सरलाही सामोरं जावं लागू शकतं.

एचआयव्हीची ओळख साधारणपणे 30 वर्षांपूर्वी झाली. मात्र, आजवर एड्सला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्याही प्रकारची लस तयार झालेली नाही. 1943मध्ये डेंग्यू तापासाठी जबाबदार असलेल्या व्हायरसची ओळख पटली. मात्र, यावरील पहिल्या लसीला गेल्यावर्षीच परवानगी मिळाली आहे. याशिवाय काही बाबतीत लस फेलही झाली आणि संक्रमण अनेक पटींनी वाढलं. तसंच सार्स आणि मर्सवरील लसही आजवर तयार होऊ शकलेली नाही. त्यामुळे कामचलाऊ लस कोरोनाला कमजोर नक्कीच करू शकते. मात्र, त्याचे दूरगामी परिणाम जाणून घेतल्याखेरीज ती लस यशस्वी झाली असं म्हणणं सध्याच्या घडीला तरी घाईचं ठरेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live