कोरोना लसीच्या डोसवर कब्जा करण्यासाठी चढाओढ

साम टीव्ही
शनिवार, 18 जुलै 2020
  • कोरोना लसीवर करायचाय अनेक देशांना कब्जा
  • कोरोना डोसवर कब्जा करण्यासाठी चढाओढ
  • युरोपियन संघानं लसीसाठी अॅडव्हान्सही दिला

कोरोना व्हायरसची लस अजून आली नाहीये, पण या लसीवर कब्जा करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु झालेत. कुणाला करायचाय कोरोना लसीवर कब्जा ? तुम्हीच पाहा

कोरोनावर मात करणारी लस अजूनही बाजारात आली नाहीये पण या लसीवर कब्जा करण्यासाठी चढाओढ सुरु झालीय. युरोपियन संघानं या लसींवर कब्जा करण्यासाठी आधीच बोलणी सुरु केलीय. लस बनवण्यात अग्रभागी असणाऱ्या मॉडर्ना, सनोफी, जॉनसन अँड जॉनसन, बायोनटेक कंपन्यांशी युरोपियन संघानं अॅडव्हान्स रक्कमही दिलीय. 40 कोटी डोस युरोपियन महासंघानं बुक केलेत. युरोपियन महासंघाअंतर्गत येणाऱ्या २७ देशांना हे डोस पुरवले जातील.

सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकेनं या लसीवर कब्जा करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर युरोपियन युनिअननं यात पुढाकार घेतलाय. 

ईयूचा लसीवर कब्जा ? 

जॉनसन अँड जॉनसन कंपनीकडून 20 कोटी डोस युरोपियन युनिअनला हवेत

फ्रान्सच्या सनोफी कंपनीकडून 30 कोटी डोसची बोलणी सुरु आहे

मानवतेच्या दृष्टिकोनातून कोरोनाची लस सर्व देशांना मिळणं आवश्यक आहे. पण केवळ पैशांच्या जोरावर या लसीवर कब्जा करण्याचा प्रयत्न अमानवीय आहे. पण आता युरोपियन महासंघाकडून सर्व नैतिकता धाब्यावर बसवून लसीवर कब्जा कऱण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live