सावधान! करोना विषाणूृचा मुंबईत शिरकाव !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 मार्च 2020

 मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (ता.1) कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळून आला. रविवारी 12 देशातून आलेल्या दोन हजार 285 प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान एक जण संशयित आढळला. 

 मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (ता.1) कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळून आला. रविवारी 12 देशातून आलेल्या दोन हजार 285 प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान एक जण संशयित आढळला. 

12 देशातून आलेल्या प्रवाशांमध्ये इराण, इटली, विएतनाम, नेपाळ, इंडोनेशिया, मेलेशिया, चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरिया येथील प्रवाशांचा समावेश आहे. यामधील एक संशयित व्यक्ती कोरोना विषाणूची संशयित आढळून आली. मात्र, अद्याप त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याची खातरजमा करण्यात आलेली नाही. तर शनिवारी (ता.29) 105 लोकांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. तर अद्याप चार जण निगराणीखाली आहेत.

तसेच मुंबईतील एका रुग्णालयात दोन जणांवर उपचार केला जात आहे. तर पुणे आणि नाशिकमधील काही व्यक्तींना विशेष कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे एकही प्रकरणसमोर आलेले नाही. 

59 हजार 654 जणांची तपासणी 
18 जानेवारी ते आतापर्यंत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर एकूण 59 हजार 654 जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु, यातील बहुतांश जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, सध्यस्थितीत मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची अजूनही तपासणी केली जात आहे, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली.  

 

Web Title:  corona virus suspected in a patient on chhatrapati shivaji terminal....


संबंधित बातम्या

Saam TV Live