आता कोरोना विरोधात कोरोना, अमेरिकेनं प्रोटीन्सने बनवला कोरोना व्हायरसचा डुप्लिकेट

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020

 

  • कोरोना विरोधात कोरोना
  • अमेरिकेनं प्रोटीन्सने बनवला कोरोना व्हायरसचा डुप्लिकेट
  • कोरोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात तयार करणार ऍटीब़ॉडीज 

काट्यानं काटा काढणं अशी एक उक्ती आपल्याकडे प्रचलित आहे. पण आता याच उक्तीनुसार अमेरिकेनं कोरोनाचा काटा काढायचं ठरवलंय.

कोरोनाविरोधात सारं जग लढा देतंय. लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अमेरिकेनं कोरोनाचा काटा काढण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवलीय. वॉशिंगटन युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिननं कोरोनाचा डुप्लिकेट व्हायरस तयार केलाय. अर्थात हा व्हायरस मानवी शरीरासाठी घातक नसून फायद्याचा असणारंय. काही जेनेटीक बदल करून प्रोटीन्सच्या मदतीनं हा व्हायरस बनवण्यात आलाय. जो कोरोनाविरोधात लढण्यासाठी मानवी शरीरात अँटीबॉडीज तयार करेल. 

काय आहे प्रोटीन व्हायरस ?

या अमेरिकन व्हायरसं नाव VSV म्हणजे वेसिकुलर स्टोमे-टाइटिस ठेवण्यात आलंय. वॉशिंगटन यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन नं हा व्हायरस तयार केलाय. प्रोटीन्सचा वापर करून हा व्हायरस तयार करण्यात आलाय.  संशोधकांच्या दाव्यानुसार हा व्हायरस माणसाच्या शरीरात सोडल्यानंतर किरकोळ सर्दी तापाची लक्षणं दिसू शकतात. त्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज कोरोनाचा सक्षमपणे सामना करू शकतात असा दावा करण्यात आलाय. 

फायनल व्हीओ - अमेरिकन संशोधकांच्या म्हणण्यानुसार हवेतूनही कोरोनाचा फैलाव होतोय. कोरोनाचे कण ही अतिशय घातक ठरू शकतात. अशा वेळी माणसाची रोगप्रतिकारक शक्ती चांगलं असणं आवश्यक आहे. कोरोना व्हायरस नेमकं तेच काम करेल..आता अर्जेंटिना, मेक्सिको, ब्राझील आणि कॅनडातही यावर संशोधन केलं जाणारंय. अमेरिकेच्या या संशोधनाला यश मिळालं तर कोरोना संकटात हे देखील एक क्रांतीकारक पाऊल ठरू शकेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live