मुंबईसह महाराष्ट्र आणि भारतातील कोरोना संकट इतक्या दिवसांत संपणार? वाचा, कोणी केलाय दावा

साम टीव्ही
शनिवार, 18 जुलै 2020

मुंबईतील कोरोना संकट येत्या दोन आठवड्यांत संपुष्टात येईल, असा दावा करण्यात आलाय. तसेच राज्यातील  कोरोना संकट दोन महिन्यात तर देशातील कोरोना अडीच महिन्यांत संपेल, असा निष्कर्ष आयआयटी मुंबईतील प्राध्यापक भास्करन रामन यांनी मांडलाय.

मुंबईतील कोरोना संकट येत्या दोन आठवड्यांत संपुष्टात येईल, असा दावा करण्यात आलाय. तसेच राज्यातील  कोरोना संकट दोन महिन्यात तर देशातील कोरोना अडीच महिन्यांत संपेल, असा निष्कर्ष आयआयटी मुंबईतील प्राध्यापक भास्करन रामन यांनी मांडलाय. अमेरिकन प्रा. मायकल लेविट यांनी चीनच्या हुबेई प्रांतातील करोना महामारीचा अभ्यास केला.

हुबेईतील स्थितीनुसार त्यांनी अन्य देशातील कोरोना संकटाचा अभ्यास मांडला. प्रा. लेविट यांनी मांडलेल्या अभ्यासाचा भारतावर कसा परिणाम होईल, हे रामन यांनी मांडले आहे. अन्य देशांमधील लोकसंख्या व त्या लोकसंख्येच्या तुलनेत तेथील करोनारुग्णांचा आकडा तसेच मृतांची संख्या, यांचा विचार केल्यास भारतातील हा आकडा फार कमी आहे, असे रामन यांनी बिजगणितीय अभ्यासाद्वारे मांडले आहे. यामुळेच देशभरातील करोना महामारी आता अंतिम टप्प्याकडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.एकीकडे देशाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असताना दुसरीकडे आयआयटीच्या प्राध्यापकांनी केलेल्या दाव्यावर शंकाही उपस्थित केली जातेय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live