सावधान! तुमच्या मास्कवरच असू शकतो कोरोनाचा विषाणू...कसा? वाचा...

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 8 एप्रिल 2020

कोरोनामुळे प्रत्येकजण मास्क वापरतोय, मात्र हाच मास्क कोरोनाला निमंत्रण देणारा ठरू शकतो.

कोरोनाच्या विषाणूनं जगासह भारताला जेरीस आणलंय. त्यामुळे जगातला प्रत्येकजण तोंडावर मास्क लावून बसलाय. मात्र हाच मास्क कोरोनाला आसरा देत असल्याचा निष्कर्ष जागतिक संस्थांनी काढलाय. चीनमधल्या हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी हा धक्कादायक निष्कर्ष काढलाय.

तुमच्या मास्कवर बसलाय कोरोनाचा विषाणू?

हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते मास्कवर कोरोनाचा विषाणू जास्त वेळ जिवंत राहतो. संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार फेस मास्कवर कोरोनाचा विषाणू 7 दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहतो. त्याचप्रमाणे कोरोनाचा विषाणू टिश्यू पेपरवर 3 तास, लाकडावर दोन दिवस, काच आणि चलनी नोटांवर चार दिवस जिवंत राहतो. 
याचाच अर्थ हा होतो की,कोरोनापासून बचावासाठी आपण जो मास्क वापरतो तोच कोरोनाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. असं असलं तरी जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र मास्कचा वापर योग्य रित्या केला तर मास्कपासून कोरोनाचा धोका टाळू शकतो असं सांगितलंय. तसा व्हिडीओच जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलाय.

  •  मास्क चेहऱ्यावर लावताना तो जास्त सैल किंवा जास्त आवळलेला नसावा.
  • मास्कमध्ये संपूर्ण नाक झाकलं जायला हवं.
  • त्यानंतर मास्कने तोंड आणि हनुवटी पूर्ण झाकून घ्यावी.
  • मास्कच्या पृष्ठभागावर हाताचा स्पर्श होऊ देऊ नका.
  • मास्क काढतानाही पृष्ठभागावर स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
  • जागतिक संशोधन संस्थांनी मास्कबाबत धोक्याचा इशारा दिला असला तरी, मास्कचा वापर योग्यपद्धतीने आणि दिलेल्या सूचनांनुसार केला तर कोरोनाचा धोका टाळता येतो. त्यामुळे मास्क वापरताना काळजी घ्या.
     


संबंधित बातम्या

Saam TV Live